अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥
अर्थ: संपूर्ण सजीव सृष्टी अन्नावर अवलंबून आहे, अन्नाची निर्मिती पावसापासून होते, पाऊस यज्ञाद्वारे प्राप्त होतो आणि यज्ञ विहित कर्मातून निर्माण होतो.
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥
अर्थ: संपूर्ण सजीव सृष्टी अन्नावर अवलंबून आहे, अन्नाची निर्मिती पावसापासून होते, पाऊस यज्ञाद्वारे प्राप्त होतो आणि यज्ञ विहित कर्मातून निर्माण होतो.
‘यज्’ धातूचा अर्थ आहे पूजा, संगति (एकत्र येणे), दान.
यज्ञ म्हणजे अग्नीसमोर विशिष्ट मंत्रांनी देवतांचे आवाहन करून हविष्य (आहुती) अर्पण करणे, त्यातून
देव, ऋषी, पितर यांचे तृप्तीकरण व लोककल्याण साधणे.
यज्ञ म्हणजे वैदिक परंपरेतील पवित्र अग्निपूजा होय. यामध्ये अग्नीत आहुती अर्पण करून देवता, निसर्ग
आणि विश्वाशी समन्वय साधला जातो.
यज्ञाचा उद्देश शुद्धीकरण, सकारात्मक ऊर्जा वाढवणे, कल्याण व शांती प्राप्त करणे हा आहे.
मंत्रोच्चार व विधींच्या माध्यमातून यज्ञ केला जातो.
तुमच्या पवित्र कार्यासाठी सुलभतेने नोंदणी करा आणि ईश्वरी आशीर्वादाचा लाभ घ्या.
नोंदणी करा
वैदिक परंपरेनुसार यज्ञ ही एक अत्यंत शिस्तबद्ध आणि शास्त्रोक्त प्रक्रिया आहे. यज्ञाची पूर्णता होण्यासाठी खालील पाच प्रमुख घटकांचे (अंगांचे) विशेष महत्त्व असते:
यज्ञाचा मुख्य हेतू, उद्देश आणि ज्यांच्यासाठी यज्ञ केला जात आहे, त्यांचे नाव उच्चारून विधीवत संकल्प करणे.
पवित्र मंत्रांच्या पाठासह अरणी मंथन किंवा शुद्ध कापूर वापरून विधीपूर्वक यज्ञाचा अग्नी जागवणे.
यज्ञाच्या विशिष्ट अधिष्ठाता देवतांना मंत्रांच्या साह्याने यज्ञात उपस्थित राहण्यासाठी सप्रेम आमंत्रण देणे.
स्वाहाकारासह हविष्य (साजूक तूप, समिधा, धान्य) अग्नीमध्ये अर्पण करून देवतांना तृप्त करणे.
यज्ञाची सांगता म्हणून दिलेली अंतिम मुख्य आहुती, जी यज्ञाच्या यशाचे आणि फलप्राप्तीचे प्रतीक आहे.
दररोज करायचे यज्ञ (अग्निहोत्र, दर्शपौर्णमास, आग्रयण).
विशिष्ट फलासाठी (पुत्रकामेष्ठी, सर्वकामेष्टी, राजसूय, अश्वमेध).
पापपरिहारासाठी.
जनकल्याणासाठी (सार्वजनिक सत्यनारायण यज्ञ, रुद्रयज्ञ, दुर्गायज्ञ).