भ्रूगुरत्रिर्वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तदा । नारदो नग्नजिच्चैव विशालाक्ष: पुरन्दर :।।
ब्रह्मा कुमारो नंन्दीश : शौनको गर्ग एव च । वासुदेवो अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती :।।
अष्टादशैते विख्यता वास्तूशास्रोपदेशका संक्षेपण उपदिष्टम यन्मनवे मत्स्यरूपिणा ।।
अर्थ: भृगू, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नंदीश्वर, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्राचार्य आणि बृहस्पती: हे वास्तुशास्त्राचे १८ प्रख्यात उपदेशक (प्रवर्तक) मानले जातात. मत्स्य रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंनी राजा मनूला वास्तुशास्त्राचे जे ज्ञान थोडक्यात सांगितले, त्यात या १८ विद्वानांच्या परंपरेचा उल्लेख केला आहे.